खरीप पूर्व पीक नियोजनाबाबत शेतकऱ्यांसोबत आढावा बैठक रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदार संघातील शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन


अहमदनगर दि २६ (प्रतिनिधी)-

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्याची खरीप पूर्व पीक नियोजन आढावा बैठक पार पडली. बैठकीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कर्जत आणि जामखेड तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने बाजरी, तुर, मग, उडीद, सोयाबीन, कांदा ही पिके घेतली जातात. त्यामुळे पिकांच्या लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी चांगल्या दर्जाचे बियाणे, रासायनिक खते, मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठीच दोन्ही तालुक्याची मिळून एकत्रित आढावा बैठक खरीप हंगामाच्या पूर्वी घेण्यात आली. गतवर्षी कर्जत आणि जामखेड दोन्ही तालुक्यातील मिळून ६६,४९८ हेक्टर क्षेत्रात उडीद पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. यावेळी बियाणांचा तुटवडा निर्माण झाला होता. पण रोहित पवार यांनी बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन तो प्रश्न सोडवला होता. मागच्या वर्षी रोहित पवार यांच्या प्रयत्नातून सुयोग्य नियोजन झालं होतं, यावर्षी त्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे नियोजन व्हावं यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी पवार हे सतत प्रयत्नशील असतात.

शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने व्हावा या अनुषंगाने कर्जत जामखेड तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. तसेच शेतकऱ्यांनीही या बैठकीला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला कृषी विभागाचे रवींद्र माने, शंकरराव किरवे, अनिल गवळी, पद्मनाभ म्हस्के, रुपचंद जगताप, राजेंद्र सुपेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


more recommended stories